रुईच झाड़
रुईच झाड़
रुईच झाड़ कुठेही उगवत
पण
त्याच बी कोणी पेरीत नाही,
ते झाडावरुन उडत, वार्यासंगे
आणि कुठेतरी मातीत जाऊन पड़त
मातीन प्रेम दिल तर रुजत
त्याच मग झाड़ होत...
सत्यही असच रुजत म्हणतात,
मी पाहिलेल नाही...
मैत्री आणि प्रेमाची बिज मात्र
अशीच उड़तात, जाऊन पडतात
आणि रूजतात, वाढतात...
त्यांना लागत नाही निमंत्रण
त्यांना लागत नाही प्रयोजन...
क्षणच्या कणीकान्नाच
अनत अस्तित्वाचे संदर्भ देत
ती जगत राहतात, अपराजीतपने...